Share

मध्यरेल्वे उशिराने धावत असेल तर रेल्वेने डोंबिवली-कल्याण स्थानकावरून विशेष लोकल सोडाव्यात : मनसे

Published On: 

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून मध्यरेल्वे वारंवार उशीराने धावत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील प्रवाश्यांचे त्याच प्रमाणे कर्जत-कसारा लाईन वरील प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने अश्या वेळी डोंबिवली आणि कल्याण वरून विशेष लोकल सोडाव्यात व त्याचे नियोजन करावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

डोंबिवली करीता विशेष अधिकारी नेमून त्याद्वारे परिस्थिती नियंत्रणात येईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन पुलावर ये-जा करणाऱ्या डोंबिवलीकरांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या तिकीट तपासणीसांच्या(tc) धाडी त्वरीत थांबवाव्या अशी देखील मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत मनसेने डोंबिवली रेल्वे स्टेशन प्रबंधकांची भेट घेत पत्रव्यवहार केला आहे. याच विषयावर लवकरच मनसे डोंबिवलीचे शिष्टमंडळ डिआरएम यांची भेट घेणार आहे असे मनसे कडून सांगण्यात आले.यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम,जिल्हा संघटक राहुल कामत, महिला शहर अध्यक्षा मंदाताई पाटील,स्मिता भणगे,निलेश भोसले, संजीव ताम्हणे,दिपक शिंदे,वेद पांडे,विवेक भणगे,भाग्येश ईमानदार,हर्षद देशमुख,रवी गरूड, हेमंत दाभोळकर,ओम लोके, संदिप सागवेकर,सुधिर सप्रे उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!