औरंगाबाद : ब्रेक द चेन अंतर्गत शहरात ५ ते २५ एप्रिल दरम्यान व्यापारी, विविध प्रकारची व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रातील साहित्याचे दुकाने लवकरात लवकर सुरु करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
शहरात ५ ते ३० एप्रिल दरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. पण बांधकाम क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. कारण कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता शहरातील बांधकामाची परवानगी द्यावी त्यासाठी लागणारे साहित्य सिमेंट, लोखंड, हार्डवेअर, सामनाचे दुकान बंद ठेवायचे असे आडमुठपणाचे धोरण राबवणे प्रशासने बंद करावे.
अशी मागणी भाजप कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस संजय जोरले यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासानाकडे केली आहे. बांधकामाला लागणारे साहित्य मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कामगारांच्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत होत आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी करून सर्व नियमांचे दुकानदार पालन करतील अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती
- #PrincePhilip : प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन,ब्रिटनमध्ये शोककळा
- परभणी जिल्ह्याला मिळाले १८ हजार कोरोना लसीचे डोस
- हळहळ! मुलीचे लग्न ठरल्याने एकाच दोरीला गळफास घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या
- लसीकरणाचा उत्सव करायला महाराष्ट्रात लसीच नाहीत, पंतप्रधानांची व्यवस्था चुकतेय – अस्लम शेख

