लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. लंडनमधील बकिंघम पॅलेसनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रिंस फिलिप यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे. १९४७ साली एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप यांचे लग्न झाले होते. सर्वात प्रदीर्घ काळसेवा देणारे ब्रिटीश राजघराण्यातील हे जोडपे ठरले आहे.
दरम्यान, प्रिन्स फिलीप यांचा 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर जन्म झाला होता.प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. त्यांचे वडील प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (पहिले) ऑफ हेलेनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते.त्यांच्या आई प्रिन्सेस ॲलिस लॉर्ड माउंटबॅटन यांची मुलगी आणि राणी व्हिक्टोरिया यांची नात होत्या.
राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातवंडं आणि दहा पतवंडं आहेत.त्यांचे पहिले पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स यांचा 1948 मध्ये जन्म झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या भगिनी, द प्रिन्सेस रॉयल, प्रिन्सेस ॲन यांचा 1950 मध्ये, 1960 साली ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांचा आणि 1964 साली अर्ल ऑफ वेलेक्स प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- धक्कादायक! गावातील सप्ताहातून दोन दिवसांत ५५ जणांना कोरोना
- आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत
- सचिन वाझेला दिलासा, एनआयए कोठडीतून सुटका तर न्यायालयीन कोठडीत रवानगी
- लसीकरणाचा उत्सव करायला महाराष्ट्रात लसीच नाहीत, पंतप्रधानांची व्यवस्था चुकतेय – अस्लम शेख

