परभणी : जिल्ह्याभरात १८ हजार कोरोनाचे डोस उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाभरात कोठेही लसीची कमतरता नाही. चार ते पाच दिवस पुरेल एवढा एवढा डोस सध्या उपलब्ध आहेत. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे सुरु आहे.
तर या मध्ये सिरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी जिल्ह्याला मिळाल्या आहेत. आत्ता पर्यंत १ लाख ४ हजार ८५० डोस मिळाले आहेत. त्यापैकी ८३ हजार ४८४ नागरिकांना लसीकरण केले आहे. लसीकरणाला नागरिकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोस हवे त्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.सध्या १३ हजार ५५० डोस शीतकरण साखळीमध्ये ठेवलेले आहेत. शीतगृहामध्ये ५ हजार २४० डोस आहेत.तर जिल्ह्यातील एकुण डोसची संख्या १८ हजार ९९० एवढी आहे. तर या मुळे ५ ते ६ दिवस पुरेल एवढे लसीची कमतरता पडणार नसल्याची माहिती या वेळी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी लसीकरणाच्या बाबतीत कोणताही चिंता करु नये. जशी जशी लस उपलब्ध असेल तसे लसीकरण घेण्यात येणार आहेत. एक वायल लसीकरणासाठी बाहेर काढल्यानंतर त्यातुन दहा जणांना लस देता येते. यावेळी काही डोस वाया जाण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरलेले असते. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ३ टक्के डोस वाया गेले आहेत. तर ८३ हजार ४८४ नागरिकांनी लसीकरण केले आहे. दरम्यान ८५ हजार ८६० डोसचा वापर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा

