अंतरराष्ट्रीय : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रेट ब्रिटनने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवून 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी राष्ट्राला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करत आपल्याला अलर्ट राहिला पाहिजे, अशी सूचना केली.
स्टे अलर्ट सिस्टमद्वारे आम्ही संक्रमित व्यक्तींना शोधून काढत आहोत. जर कोणाला वर्क फ्रॉम होम करायचे नसेल तर ते कार्यालयात जाऊ शकतात, परंतु सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळलं पाहिजे. लोकांना उद्यानात सोडता येईल. तसेच 1 जूनपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
परदेशातून प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी टाळेबंदी गरजेची असल्याचे सांगत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा बोरिस यांनी केल्याचं सांगितलं आहे.या काळात कोणतेही कठोर नियम केले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान ग्रेट ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 19 हजार 183 इतका आहे. तर त्यापैकी 31,855 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 86 हजार 984 एवढे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून 1,559 जण गंभीर आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

