Share

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावली एसटी; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले

Published On: 

मुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने आज पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५ हजार ८०० प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले,मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरिता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून देवून पहाटे ४ वाजल्यापासून बस सेवा सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५ हजार ८०० हून अधिक प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले.

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा बस सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती परब यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!