Share

‘न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही’

Published On: 

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सीबीआयची टीम उद्या मुंबईत येऊन सुशांतच्या घराची तपासणी करणार आहे. त्यानंतर सीबीआय मुंबई पोलीसांनाही भेटणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपुर्द केल्याने, सीबीआय आता चौकशीला लागली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देशभरातून या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत.“न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही,” अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही या प्रकरणावरुन ठाकरे हल्लाबोल केला आहे. निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास कुठेतरी कमी पडत होता.हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा. सुशांत सिंग राजपूत मृत्यू तपास सीबीआयकडे सोपवावा. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोणालाही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास कमी पडत होता. हे दिसूनही येत होता, त्याचे कारण सरकारला माहिती आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!