🕒 1 min read
Saamana | मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृतीदिन (Balasaheb Thackeray Death Anniversary) आहे. या निमीत्त खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana) आग्रलेखात विशेष बाबी लिहून अभिवादन केलं आहे. तसेच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकावर जावून अभिवादन केलं.
बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढगाला अजिबात स्थान नव्हते. बाळासाहेब सगळ्यांचे होते; पण त्यांनी बेइमानीस कधीच थारा दिला नाही. लाखो निष्ठावान शिवसैनिक आज बाळासाहेबांचा जयजयकार करतील. त्यांच्या विचारांच्या पेटत्या मशालीसमोर नतमस्तक होतील. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे! जगाच्या इतिहासातील अमर महापुरुषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योद्धेपण इतिहासात अधिक तेजाने तळपत राहील, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
यादरम्यान, शिवसेना ही प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रीय बाण्यासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे होते व आजही आहेत. त्या संघटनेच्या पाठीत भाजपने चाळीस खंजीर खुपसून देशद्रोहच केला. हा देशद्रोहासारखाच प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवून ‘बदला’ घेतला म्हणून ज्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटतात त्यास महाराष्ट्रीय मातीचा माणूस कधीच म्हणता येणार नाही. शिवसेनेतील एका ‘डरपोक’ गटास आपले लाचार व मिंधे बनवून त्याच्या समोर सत्तेची हाडके टाकली गेली असल्याचं देखील सामना आग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, हा कुणास बदला वगैरे वाटत असेल तर महाराष्ट्राची 11 कोटी जनता या बदल्याचा महासूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयाने ते सिद्ध झाले आहे. लोकांची आजही शिवसेनेवर श्रद्धा आहे. त्या शिवसेनेचे नेतृत्व श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट होते. बाळासाहेबांना ज्याप्रमाणे कट्टर विरोधक भेटले त्याप्रमाणे त्यांच्यावर अफाट प्रेम करणारेही असंख्य होते. विरोधकही त्यांच्यावर प्रेमाचा आणि स्तुतीचा वर्षाव करीत. बाळासाहेबांचे व्यक्तित्व होतेच तसे. अशा बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेइमानी करूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही. ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगत. भाजपने ढोंगाशी ‘निकाह’ लावून सरकार बनवले व त्या ढोंगालाच ते ‘शिवसेना’ मानत आहेत. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि पडून काढले असते. महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चाळीस बेइमान खंजिरांसह शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत, असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2023 | एम एस धोनी नंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार, वसीम जाफरने केले मोठे वक्तव्य
- Narayan Rane | नारायण राणे यांना झटका! कोर्टाच्या आदेशानंतर ‘अधिश’ बंगल्यावर हातोडा
- Sushma Andhare | “सुषमा अंधारे यांनी त्यांचं अंधारे अडनाव बदलून आगलावे करावं”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
- Gajanan Kirtikar | गजानन कीर्तिकरांवर काँग्रेस कार्यकर्ते संतापले, कार्यकर्त्यांचं आंदोलन
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार!, ईडीने बजावली नोटीस अन् दिला ‘हा’ आदेश


