Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; शहर कडकडीत बंद

Published On: 

परळी वै. : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर मोदी व फडणवीस सरकारने केलेल्या सुडबूध्दीच्या कारवाईचा धिक्कार करण्यासाठी परळी शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या परळी बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टायगर अभी जिंदा है… पवार साहेब तुम संघर्ष करो.. हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परळी शहर दणाणून सोडले.

शिखर बँकेच्या कल्पोकल्पित भ्रष्टाचाराप्रकरणी कोणताही संबंध नसताना केवळ राजकीय सुडबूध्दीने आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत असलेल्या पाठींब्यामुळे घाबरलेल्या भाजपा सरकारने शरद पवार साहेबांवर गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे संपूर्ण राज्याप्रमाणेच परळी शहरातही तिव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली तर आज गुरूवारी परळी बंदचे आवाहन केले होते.

परळी बंदच्या या आवाहनाला पुरोगामी विचाराच्या परळीकरांनीही तेवढीच मोलाची साथ देत सकाळपासूनच आप-आपले दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला. शहरातील एक ना एक दुकान, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वाजल्यापासूनच शहरात फिरून व्यापार्यांना शांततेच्या मार्गाने बंद पाळून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील शिवाजी चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तिव्र निदर्शने केली.

टायगर अभी जिंदा है… पवार साहेब तुम संघर्ष करो… हम तुम्हारे साथ है… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो… धनंजय मुंडेंचा विजय असो… या सरकारचे करायचे काय… खाली मुंडके वर पाय… अशा घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडले. सरकारच्या कारवाईचा शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी धिक्कार करून ही कारवाई न थांबवल्यास या पुढेही तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या आंदोलनात शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, ज्येष्ठ नेते सुरेश टाक, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, केशव बळवंत, संजय फड, बाळुसेठ लड्डा, गोपाळ आंधळे, श्रीकांत मांडे, सुरेश गित्ते, कमलकिशोर सारडा, प्रताप देशमुख, शंकर आडेपवार, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी सिराज भाई, शंकर कापसे, सचिन जोशी, दिलीप कराड, विष्णु साखरे, के.डी.उपाडे, अनंत इंगळे, बळीराम नागरगोजे, जमील अध्यक्ष, सचिन देवकर, सचिन मराठे, महेश शेप, महेंद्र रोडे दत्ता सावंत, नरेश हालगे, नाजेर भाई, वाजेद भाई, एस.यु.फड, सतिश गंजेवार, तौफीक गंजेवार, कृष्णा मिरगे, लालू पठाण, रवि आघाव, शकील कच्छी, रौफीक पटेल, भागवत गित्ते, महिपाल सावंत, पापा ठाकूर, कवडेकर सर, मुसा भाई, चौहान सर, प्रदिप आरसुळे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177146521197801472?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177140825324572672?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177140618738290689?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!