Share

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित दिसणार आता नव्या भूमिकेत

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा आरसीबी संघाकडून पराभव झाला. सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होत असलेल्या दुसऱ्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाने कसुन सराव सुरु केला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवर हा सामना होत आहे.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गतविजेत्या मुंबईने आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कोलकाता विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित हा एका नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या आधी सरावाचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा हा गोलंदाजी करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CNh58Y_DjPS/

आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १५९ धावांचे लक्ष्याचा बचाव करताना मुंबईला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवली होती. मुंबईचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या फिटनेसच्या कारणामुळे गोलंदाजी करत नाही. त्यामुळे जर सहाव्या गोलंदाजाची गरज वाटली तर कर्णधार रोहित गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये रोहितने आतापर्यंत १५ गडी बाद केले आहे. तर ६ धावा देत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगीरी आहे. महत्वाची बाब म्हणजे रोहितने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना एक हॅटट्रिक देखील आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!