🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसची स्थितीबद्दल मोठे भाष्य केलं. काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपआपल्या तयारी सुरु केली आहे. यावरुन आघाडीमध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, पवारांचे विधान काँग्रेसला बोचल्याचे दिसून आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील त्यावर भाष्य केलं.
‘काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते. म्हणूनच पवारांनी त्या माडीला टेकू दिला आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये परतावे की परतू नये, याबद्दल रावसाहेब दानवेंनी मतप्रदर्शन करून बारा….. पाना हे स्वतःला त्यांनी का म्हंटल होतं हे सिद्ध केलंय ????@TV9Marathi@abpmajhatv@saamTVnews
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 14, 2021
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून दानवेंनी खोचक टोला लगावला आहे. ‘पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये परतावे की परतू नये, याबद्दल रावसाहेब दानवेंनी मतप्रदर्शन करून बारा…पाना हे स्वतःला त्यांनी का म्हंटल होतं हे सिद्ध केलंय.’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा!
- ‘यॉर्करकिंग’ मलिंगाची इनिंग संपली; …म्हणून तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती ?
- कपडे लाॅन्ड्रीत टाकले तरी भाजपवाले मनी लॉन्ड्रींग केस करतील आणि…; राऊतांनी उडवली खिल्ली
- ‘नाहीतर अलीगढच्या कुलुपविक्रेत्याला पैसे परत मिळालेच नसते’, काँग्रेसकडून मोदींच्या ‘त्या’ आठवणीची खिल्ली
- माझा आणि राहुल गांधींचा एकमेकांच्या खांद्यावर हात – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

