Share

दाक्षिणात्य सुपरस्टार अनिल नेडुमंगड यांचा धरणात बुडून मृत्यू

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेते अनिल नेडुमंगड याचं शुक्रवारी निधन झालं. माहितीनुसार  केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीला गेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. अनिल नेदुमंगड हे थोडुपुझा येथे त्यांच्या आगामी सिनेमा ‘पीस’चं शूटिंग करण्यासाठी गेले होते. चित्रपटाच्या शूटिंग नंतर हा अपघात झाला आहे.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्वीट करत अनिल नेदुमंगड यांच्या निधनाची माहिती दिली. “काहीच नाही, माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. अपेक्षा करतो की तुमच्या आत्म्याला शांती लाभली असेल”, असं ट्वीट त्याने केलं.

दिलेल्या माहितीनुसार, अनिल नेदुमंगड हे थोडुपुझा येथे जोजू जॉर्ड यांच्या ‘पीस’ या सिनेमाटं शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान सिनेमातील अभिनेते आणि क्रू मेंबर्सने ब्रेक घेतला. त्यानंतर अनिल आणि त्यांचे काही मित्र धरणावर पोहायला गेले. बाकीचे लोक किनाऱ्यावर थांबले, पण अनिल हे खोल पाण्यात गेले आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाले. अनिल दिसत नसल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोधल्यानंतर अनिल यांच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनिल यांचा मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!