Share

वर्ल्ड कप २०१९ : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ४९ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे वर्ल्ड कपमधून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली आहे.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या बाबर आझम आणि हॅरिस सोहेलच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०९ धावांचं मोठं आव्हान उभं केलं. याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ५० षटकांत नऊ बाद २५९ धावाचं करू शकले. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर, वहाब रियाझ आणि शादाब खानने शानदार गोलंदाजी केली व पाकिस्तानच्या विजयात हातभार लावला.

दरम्यान, पाकिस्तान अंकतालिकेत सातव्या स्थानी आहे. उर्वरित सामने जिंकून पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीत पोहचू शकतो. तर स्पर्धेतून बाहेर पडणारा आफ्रिका हा दुसरा संघ आहे, यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!