Share

सोनू सूदला चाहत्याने दिली खास अंदाजात भेट; गाठले अफ्रिकेतील सर्वात उंच शिखर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील अनेक कोरोनाग्रस्त आणि गरजवंत लोकांना मदत आजही अहोरात्र मदत करत आहे. अनेकजण त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्याच्या या कार्यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील वाढला आहे. अशाच सोनूच्या एका चाहतेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

अफ्रिकेतील किलिमंजारो या सर्वात उंच शिखराव सायकलस्वार उमा सिंहने चढाई करत आपला हा विजय सोनू सूदला समर्पित केला आहे. सायकलस्वार उमा सिंहने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उमा सिंहने लिहिलं आहे. “१५ ऑगस्टला मी अफ्रिकेतील सर्वात उंच माउंट किलिमंजारोच्या शिखरावर होतो. त्या व्यक्तीला समाल करण्यासाठी जो आधीच एका शिखरावर आहे. हा विजय केवळ सोनू सूद यांना समर्पित. कायम प्रेरणा दिल्याने धन्यवाद.” असं म्हणत उमा सिंहने सोनू सूदचे आभार व्यक्त केले आहे.

सोनू सूदने देखील उमा सिंहच्या या कामगिरीबाबत ट्वीट करत लिहिलले की, ‘मला उमाचा खूप अभिमान आहे. मोठ्या मुश्किलीने त्याने हे यश प्राप्त केलंय. यात त्याची मेहनत आणि जिद्द दिसून येते. मी त्याच्या बोलण्याने खूपच प्रभावित झालो. तरुणांसाठी तो प्रेरणा देणारा आहे,’ असं म्हणत सोनूने उमाचं कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!