🕒 1 min read
सोलापूर : अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या आई-वडिलांसोबत लॉकडाउनचा वेळ घालवतेय. घरातील कामं, चित्र काढणे, वेब सीरिज पाहणे यात ती स्वत:ला गुंतवून ठेवतेय. नुकतेच तिने ‘मिड डे’ला एक मुलाखत दिली, त्यात तिने सांगितलं कि, “तिला तिच्या अभ्यासाची फार चिंता सतावतेय”.
मुलाखतीत रिंकू म्हणाली, “आमच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा होती. आम्ही सगळी तयारी केली होती. मात्र आता ते म्हणतायत की परीक्षा होणार नाहीत. नवीन अभ्यासक्रम सुरू होईल तेव्हा काय होईल, असा प्रश्न विद्यार्थांना पडला आहे.” रिंकू सध्या FYBAचं शिक्षण घेत आहे. “माझं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी आई-वडील आग्रही आहेत. त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी अभिनयाकडे फार लक्ष देऊ शकत नाही”, असं ती पुढे म्हणाली.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाल्याने रिंकूने आनंद व्यक्त केला आहे. ती लवकरच ‘झुंड’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं असून त्यात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे.
नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ची पहिली झलक पाहिली का ?
नागराजच्या ‘झुंड’चा दमदार टीझर आला रे SSS
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
