Share

गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले

Published On: 

नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून देखील नागरिकांना जिल्ह्यात आणण्यात आले आहे.

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या सुचनेनुसार दोन्ही प्रकल्प कार्यालयांनी मजुरांना परत आणण्यासाठी नियोजन केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाशी आणि जिल्ह्यातील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तिथल्या मजुरांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी शैलेश पाटील, अमोल मटकर, राहूल इधे आणि किरण मोरे या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असावा यासाठी निर्धारित वेळेत दुकाने खुली राहणार

द्वारका येथील 220, पोरबंदर 55, वापी 103, आणंद 37, जामनगर 59, बडोदा 32, गांधीनगर 43, भरूच 102, दमण 25 अशा प्रकारे एकूण 676 मजुरांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सर्व मजुरांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून वाहनाची सोय केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ

आदिवासी विभागामार्फत न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून वाहन खर्चाची सुविधा करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे यातील बरेचसे मजूर गावाकडे परतले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सीमेवर सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच या मजुरांच्या भोजनाचीदेखील सोय करण्यात आली. मजुरांचा रोजगार गेल्याने त्यांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे देखील प्रयत्न प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत.

सर्व व्यवहार सुरू होणारा ‘हा’ ठरला महाराष्ट्रामधील पहिला जिल्हा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!