नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र आजही अनेक जणांच्या मनात कोरोना लसीविषयी संभ्रम तसेच अफवा पसरवल्या जात आहेत. सध्या देशात तीन लसींना मान्यता देण्याता आली आहे. त्यातील कोव्हॅक्सिन लस ज्या लसीला सर्वात जास्त मागणी आहे. ती लस गायीच्या वासराच्या सीरमपासून तयार केली जाते असा दावा केला. आरटीआयचा पुरावा देत काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी मोदी केंद्र सरकार आणि लसीच्या कंपनीने याची माहिती आधी का दिली नाही असा प्रश्नही विचारला.
यासंदर्भात आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. कोवॅक्सिन लस तयार करताना वापरलेल्या संयुगाबाबत काही समाज माध्यमांवर पोस्ट्स आहेत, जिथे असे सूचित केले गेले आहे की कोवॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश (सिरम) समाविष्ट आहे. या पोस्टमध्ये तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असून ते दिशाभूल करणारे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, लसीवर संभ्रम पसरवून कॉंग्रेसने मोठे पाप केले आहे, मला कॉंग्रेसचे नेते विशेषत: सोनिया, प्रियांका आणि राहुल यांना विचारण्याची इच्छा आहे की त्यांनी लस घेतली आहे की नाही असे ते म्हणाले.
संबित पात्रा म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीचे कॉंग्रेस पक्षाला काही प्रश्न आहेत. यात सोनिया जी, राहुल जी आणि प्रियांका जी तुम्ही तुमचा पहिला किंवा दुसरा डोस कधी घेतला होता ? गांधी कुटुंबाला लसीकरण झाले आहे का ? किंवा गांधी कुटुंबाचा लसीवर विश्वास आहे की नाही ? असे सवाल पात्रा यांनी उपस्थित केले.
ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लस ड्राइव्ह भारतात सुरू आहे आणि कॉंग्रेस पक्षाला ही लस ड्राइव्ह बंद पडावी अशी इच्छा आहे. अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी या लसीबाबत प्रश्न उपस्थित केले आणि संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे असा देखील आरोप त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

