🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता रॅलीला सुरुवात झाली. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही देशातील बेरोजगारी आणि दारिद्र्यावरून मोदी – शहा जोडीचा समाचार घेतला.
यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी-शाह सरकारने संविधानाचा अपमान केला आहे. त्यांना देश चालवण्यासाठी संसद आणि संविधानाची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. देशात अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती आहे. आज देशातला तरुण बेरोजगार आहे. नोकरी मिळवण्यासाठी तो भटकतोय. गेल्या दशकांमध्ये अशी परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. परंतु आता खूपच वाईट परिस्थिती आहे.
बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. देशभरात महागाई खूप वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सामन्यांना जगणं मुश्किल होत आहे.देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. तुम्हीदेखील घराबाहेर पडा, आंदोलन करा. आपल्याला देश वाचवायचा आहे. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत माफी मागण्याच्या मुद्यावरून टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, माझं नाव राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहे. माझा मृत्यू झाला तरी मी माफी मागणार नाही. मला भाजप खासदारांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. मी योग्य बोललो त्यासाठी माफी मागण्यास सांगितलं जात आहे. माझं नाव राहुल सावरकर नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही असं राहुल गांधी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205791155658477569?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205784928937377793?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
