Share

सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ , आज नव्याने वाढले १३ रुग्ण

Published On: 

सोलापूर –  सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा वाढतच आहे. आज दिवसभरात सोलापूरमध्ये तब्बल 13 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे,  त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 81 वरती येऊन पोहंचला आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी चार पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज नव्याने सापडलेल्या तेरा रुग्णांमध्ये सोलापुरातील सदर बाजार लष्कर येथील तीन महिला, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील एक महिला, आंबेडकर नगर माऊली चौकातील एक महिला, शामानगर (बिग बाजार जवळ) येथील एक महिला, कुमठा नाका मार्कंडेय नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष, पाच्छा पेठ जवळील शनिवार पेठेत एक पुरुष, शास्त्रीनगर मधील एक महिला व एमआयडीसी रोड वरील ताई चौक येथील एका महिलेचा समावेश आहे.

आज दिवसभरात 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 104 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या एक्क्याऐंशी असून त्यामध्ये 46 पुरुष व 35 महिला आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 75 बाधित रुग्ण दाखल असून त्यामध्ये 43 पुरुष व 32 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आयसोलेशन वार्डातील सोळाशे 24 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी बाराशे 50 जणांची रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. 374 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहेत. अकराशे 69 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!