Share

संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचं आवाहन

Published On: 

पुणे, दि.3 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणले,’डॉक्टर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्यासाठी एन 95 व सर्जिकल मास्क तसेच त्या अनुषंगीक साहित्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. साहित्य स्वरुपात ही मदत करावी, ही मदत करतांना सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावा तसेच मदत द्यायला जास्त लोकांनी येवू नये, तीन-चार लोकांनीच यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो. मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या वेबसाईटवरुनही मदत करता येईल, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

कोविड -19 (कोरोना व्हायरस) या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संस्था व विविध कंपन्या – सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- 95 मास्क, सॅनिटायझर, गॉगल, शु कव्हर, गम बूट, सोडियम हायपोक्लोराईट 5 टक्के द्रावण, फेस शिल्ड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर्स, पल्स ऑक्सिमीटर, मल्टी पॅरा मॉनिटर्स अशा वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागांस गरज असल्याने पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील मदत करणाऱ्या इच्छुकांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन एका पत्रकान्वये केले आहे.

याकरीता डॉ. संजय देशमुख-मो.नं- 9422033439, डॉ. नंदा ढवळे- मो. नं- 9822428560, श्रीमती गौरी पिसे- मो.नं- 9890408987,  गिरीश कु-हाडे- मो.नं- 7798981199 भ्रमणध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पुणे विभागातील अन्नधान्य दान करणाऱ्या इच्छुकांनी पुणे जिल्हा  भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013, श्रीमती अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 020-26123743, सातारा जिल्हा श्रीमती स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840, सांगली जिल्हा 1) श्रीमती वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512, कोल्हापूर जिल्हा दत्तात्रय कवितके जिल्हा पुरवठा अधिकारी 0231- 265579, सोलापूर जिल्हा उत्तम पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003 यांच्याशी संपर्क साधावा किंवा ईमेल कळविण्याचे आवाहनही म्हैसेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!