Share

…तर उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये, पडळकरांचा घणाघात

Published On: 

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांचा असतो. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये. असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करू नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटूंबास महापूजेचा मान द्यावा. असं ते म्हणाले आहे.

त्याचप्रमाणे, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचं देखील ते यावेळेस म्हणाले.

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये थोरातांचचं वजन, प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चांना पूर्णविराम ?

दरम्यान, नुकताच बारामती येथे भाजप कार्यालयात विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार हल्लबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारची नियत खोटी व हे सरकार प्रचंड जातीयवादी आहे. याचं बारामती मध्ये लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उद्यान आहे , परंतु आताच्या सरकारने विश्वासघात करून सत्ता मिळवली तर बारामती येथील उद्यानात जाणीवपूर्वक पाण्याची टाकी बांधून, त्यांची नियत आणि नीती धनगर समाजाबद्दल कशी साफ नाही हे दाखवून दिले. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

हफ्त्याने भरा पण वीजबिल भराच…. ग्राहकांना अजिबात फसवलं नसल्याचा ऊर्जामंत्र्याचा दावा

भाजपा सरकारच्या काळात धनगर समाजासाठी एक हजार कोटींची पॅकेज जाहीर केले होते, त्याची अंमलबजावणी मात्र या सरकारकडून अद्याप झालेली नाही याबाबत पडळकरांना विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची नियत खोटी याबाबत मी सभागृहामध्ये आवाज उठवणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले. दरम्यान, इथून पुढे मी बारामतीतील प्रश्न सोडवण्याचे व बारामातीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले तसेच माझ्यावर विश्वास टाकून ज्यांनी मला मतदान केलं अशांचे देखील आभार त्यांनी मानले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!