पुणे : परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
जे दिशा बरोबर झाले..
तेच पुजा बरोबर होणार असेल..
तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही?
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 12, 2021
भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. तर राज्य सरकारडून आणलेला शक्ती कायदा महिलांचे संरक्षण करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘जे दिशा बरोबर झाले.. तेच पुजा बरोबर होणार असेल.. तर तो शक्ती कायदा.. काय चाटायचा आम्ही?’ असा सवाल राणे यांनी ट्वीट करत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर ; भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात
- ‘भाजपने काव काव करायचे आणि राजपालांनी त्यांना चहापानास बोलवायचे ही कोणती घटनात्मक संस्कृती ?’
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?


