Share

… म्हणून खासदार इम्तियाज जलील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Published On: 

औरंगाबाद: घाटी रुग्णालयाचा खासदार इम्तियाज जलील यांनी आढावा घेतला . या बैठकीत घाटी रुग्णालयास आवश्यक असलेला निधी हा राज्य सरकारकडून मिळवून येथील समस्या दूर गेल्या जातील असे माहिती खासदार इम्तियाज यांनी दिली. यासाठीच खासदार इम्तियाज जलील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची देखील चर्चा आहे. बैठकीत सुपर स्पेशालिटीविंगचे वीज, पाणी, मनुष्यबळाचा प्रश्न, ड्रेनेजलाईन, यंत्रसामुग्रीखरेदी, रखडलेले प्रकल्प, रस्त्याच्या कामाची माहीती घेत अडचणी समजुन घेतल्या.

यावेळी त्यांनी एमआरआय बंद असल्याने त्याची पर्यायी व्यवस्था करुन डिपीसीच्या निधीतून चालणारी नऊशे रुपयांत एमआरआयची योजना पुन्हा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. औरंगाबादला लवकरच मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार आहे. घाटीला आवश्यक निधीसाठी व समस्या सोडवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे खासदार जलील म्हणाले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. कैलास झिने, डॉ. भारत सोनवणे, डॉ. मंगला बोरकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!