🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जगात क्रिकेट या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आयपीएल फ्रँचायझींना परदेशातही खेळण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यावर अजून अंतिम निर्णय झाला नसला तरी या महिन्याच्या अखेर होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत याबाबत चर्चा झाली. खेळाचा प्रसार व्हावा यासाठी आयपीएल फ्रँचायझींना परदेशातही खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यावर अजून अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. मात्र या संकल्पनेवर भर दिला जात आहे.
गव्हर्निंग कौन्सिलशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने याबाबत सांगितलं की, याकडे पाहण्याचा अत्यंत साधा आणि सोपा दृष्टीकोन आहे. तुम्ही कॅनडात आहात आणि मुंबई इंडियन्सचा सामना पाहायचा असेल, तर भारतात यावं लागेल. कॅरेबियातील व्यक्तीला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहायचा असेल तर जगाचं अंतर पार करुन भारतात यावं लागेल. मात्र परदेशात खेळण्याची परवानगी मिळाल्यास त्या चाहत्यांचं स्वप्न सोप्या पद्धतीने पूर्ण होईल.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192071541854367744?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192070200960532480?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192065561867374593?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
