Share

म्हणून मी अजित पवारांच्या मिरवणुकीला नव्हतो, रोहित पवारांची सारवासारव

Published On: 

टीम महारष्ट्र देशा : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार काल (ता. १० ) पहिल्यांदाच बारामतीत गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्यदिव्य सत्काराचे आयोजन केले होते. त्याशिवाय बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूकदेखील काढण्यात आली. मात्र या मिरवणुकीला ना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते, ना नवनिर्वाचित आमदार रोहित पवार. त्यामुळे अनेक बाजूने चर्चांना तोंड फुटले होते.

अजित पवारांचा हा भव्य कार्यक्रम असतानाही पवार कुटुंबातील या महत्त्वाच्या व्यक्तींची अनुपस्थिती बाबत रोहित पवार यांना विचारले. तेव्हा रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांचा कालचा सत्काराचा कार्यक्रम हा अचानक ठरला होता. त्यावेळी मी कर्जतला मतदारसंघात होतो. मला दादांचा फोन आला, कुठे आहेस विचारलं. तेव्हा मी मतदारसंघात आणि लोकांमध्ये असल्याचं सांगितलं. तेव्हा दादांनी सत्कार अचानक ठरला आहे, आपल्याला लोक महत्वाचे आहेत लोकांसोबत राहा असं सांगितलं. त्यामुळे मी कार्यक्रमाला नव्हतो” पवार कुटुंब हे एक आहे, एक राहील आणि विकासासाठी सदैव एकत्र राहील हे सांगतो, असं रोहित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, काल झालेल्या अजित पवार यांनी देखील याबाबत भाष्य केले. कुटुंबातील सदस्य उपस्थित नाहीत, याचा चुकीचा अर्थ काढू नका. पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आहेत आणि एकत्रच राहतील. आता स्वतः अजित पवार यांनी खुलासा केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!