Share

सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांना विविध योजनांमार्फत प्रत्येकी २५ कोटी : रावसाहेब दानवे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकार हे सिल्लोड व सोयगाव या दोन तालुक्यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी २५ कोटींची मदत करणार असल्याची माहिती दिली, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली. सिल्लोड येथे उपविभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयात थांबावे, असे आदेश ही केंद्रीय मंत्री दानवे यांनी या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना दिले.

तसेच ‘हातावर पोट असलेल्या गरीब नागरिकांचे अन्नधान्याअभावी हाल होत आहेत. म्हणूनच केंद्र शासनाने गरीब नागरिकांसाठी अत्यंत अल्पदरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. ते प्रत्येकापर्यंत पोचणे अत्यंत गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने सिल्लोड तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेमार्फत ५२ हजार २४१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे दहा कोटी ४४ लाख लक्ष रुपये, सोयगाव तालुक्यातील १८ हजार ६१३ शेतकऱ्यांना तीन कोटी ७२ हजार, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सिल्लोड तालुक्यातील ४७ हजार ६३५ कार्डधारकांना एक लाख ३४ हजार ५३२ टन, सोयगाव तालुक्यातील २० हजार ७८७ कार्डधारकांना ४४ हजार ५६४ टन तांदूळ रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत सिल्लोड तालुक्यात २० हजार ५९२ लाभार्थींना मोफत सिलिंडर फिरून देणार आहेत. त्याचे मूल्य एक कोटी दोन लाख आणि सोयगाव तालुक्यातील आठ हजार ७४ लाभार्थींना ६० लाख रुपयांचे सिलिंडर देण्यात येत आहेत. जनधन योजनेंतर्गत सिल्लोड तालुक्यातील १६ हजार ५७० लाभार्थींना प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ८२ लाख रुपये, सोयगाव तालुक्यातील १४ हजार ३९९ लाभार्थींना ७२ लाख रुपये प्राप्त होणार आहेत. अशी माहिती ही रावसाहेब दानवे यांनी दिली असल्याचे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिले. तसेच दानवे यांच्यातर्फे सिल्लोड,सोयगाव तालुक्यातील पाच हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे व २५ हजार मास्कचे वाटप सुरू करण्यात आले आहे.असेही त्यात म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!