Share

जळगाव औरंगाबाद रस्त्याने घटवले अजिंठाला जाणारे पर्यटक

Published On: 

सिल्लोड : औरंगाबाद जळगाव रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहेत हे काम संथ गतीने सुरु असल्यामुळे सर्व औरंगाबाद ते अजिंठा पर्यंतचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली आहेत व परदेशातून व देशभरातून येणारा पर्यटक ही या रस्त्यामुळे अजिंठा ला जाऊ शकत नाही. दरवर्षी लेणी पाहणाऱ्या येणारे लाखों पर्यटनकांची संख्या काही हजारावर आली आहे. परतीच्या पावसामुळे तर या रस्त्याची पुरती वाट लागली आहे त्यामुळे दिवाळीतही पर्यटक स्थानिकांनीही लेणी कडे पाठ फिरवली आहे.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी दरदिवशी हजारो पर्यटन येतात. या पर्यटकांची संख्या जवळपास शून्यावर आली आहेत कारण महामार्गाचे सुरू असलेले कामामुळे जळगाव औरंगाबाद रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहेत त्यामुळे लिहिण्यासाठी जाण्या लेणी कडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नाही.

औरंगाबादच्या पर्यटनवारीवर आलेल्या पर्यटकांना केवळ वेरूळ व औरंगाबादचे पर्यटन करूनच माघारी फिरावे लागत आहे. विशेष करून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देशातील कानाकोपर्यातून पर्यटक कुटूंबासह अजिंठा लेणी पाहण्यासाठी येतात, मात्र यंदा रस्ता खराब असल्यामुळे या पर्यटकांचाही मोठा हिरमोड झाला आहे.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटकांच्या गर्दीने फुलणारी अजिंठा लेणी यंदा पर्यटकांची प्रतीक्षा करीत आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटली खरी; परंतु रस्त्याच्या गंभीर समस्येमुळे अजिंठा लेणीकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये अजिंठ्याच्या पर्यटन व्यवसायाला खिळ बसली आहे.

जागतिक वारसाचा ठेवा असलेली अजिंठा लेणी आता रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चांगलीच चर्चेत येत आहे. दिवाळी सणाच्या काळात परतीच्या पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. यामुळे गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे करून ठेवलेले खोदकाम पर्यटनासाठी मोठा अडसर ठरले आहे. पर्यटनाच्या मोसमात लेणीमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत असल्यामुळे येथील व्यावसायिकांच्या देखत डोळ्यात पाणी येत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून होणारी परिसरातील व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190563762467528705?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190567551790505985?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!