🕒 1 min read
Shrikant Shinde | पुणे : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिल्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात श्रीकांत शिंदेनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. “ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये आणि बोलू नये”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
त्याचबरोबर यामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी राज्यातील जनतेला अशा प्रकारची विधान मान्य होणार नाही. प्रत्येकाने तारतम्य बाळगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोललं पाहिजे”, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हणालेत भगतसिंह कोश्यारी?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | “वा रे मर्दा…! राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नाही काय?”; आशिष शेलार यांचा पलटवार
- Prakash Ambedkar | शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
- IND vs BAN | पंतला संघातून बाहेर काढण्याबाबत के.एल. राहुलने केला मोठा खुलासा, म्हणाला…
- Sanjay Raut | “हिंमत असेल तर बोम्मईंना…”; सीमाप्रश्नावरून संजय राऊतांचं भाजपला आव्हान
- Raosaheb Danve | छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवेंकडून स्पष्टीकरण! मागितली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
