Share

‘शाबाश मिठू’ मितालीच्या बायोपिकचा ट्रेलर पहिला का; तापसी पन्नूची दर्जेदार ऍक्टिंग!

Published On: 

मुंबई: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक बड्या व्यक्तींवर बायोपिक बनवले जात आहेत. यात क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या नावाचाही समावेश आहे. नुकताच तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मिताली राजच्या शाबाश मिठू या चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक आणि स्टाइल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘शाबाश मिठू’ हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचा (mitali raj) बायोपिक आहे. या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखीनच वाढणार आहे. कारण टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (tapsee pannu) ज्या प्रकारे मिताली राजच्या भूमिकेत डुंबलेली दिसत आहे, तुम्हीही तिच्यापासून नजर हटवू शकणार नाही. याआधीही अनेक खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले होते. पण, महिला खेळाडूवर पहिल्यांदाच चित्रपट बनला आहे. यानंतर झुलन गोस्वामीवरही बायोपिक येणार आहे.

चित्रपटाच्या संपूर्ण टीझरबद्दल बोलायचे झाले तर तो अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आला आहे. सृजित मुखर्जी दिग्दर्शित, शाबाश मिठू हा चित्रपट कर्णधार मिताली राज तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या क्रिकेट कारकिर्दीभोवती फिरतो. मिताली राजबद्दल बोलायचे तर तिने आतापर्यंत ४ वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान तिचे जीवन किती कठीण प्रसंगातून गेले याचा प्रवास दिसेल. यानंतरही ती स्वत:ला कशी सकारात्मक ठेवते आणि देशासाठी खेळत राहते हेही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!