Share

शक्तीप्रदर्शन करत खा. प्रीतम मुंडे ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- भाजप उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली.बीडच्या विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांची काल उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रितम मुंडे या सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

बीड लोकसभा मतदार संघातून आमदार अमरसिंह पंडित हे यंदाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. दुसरी यादी जाहीर होण्याच्या क्षणापर्यंत अमरसिंह पंडित यांचे नाव निश्चीत मानले जात होते. परंतु दुसऱ्या यादीत पंडीत यांचे नाव डावलून बजरंग सोनावणे याचं नाव जाहीर करण्यात आलं. बजरंग सोनावणे हे भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध लढणार आहेत.

प्रितम मुंडे यांचा दांडगा जनसंपर्क आहे.अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करण्याची देखील तयारी सुरु केली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान,राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित सारख्या बड्या नेत्याला मागे ठेवून बजरंग सोनावणे यांना बळीचा बकरा म्हणून पुढे केले आहे की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!