Share

विनाघोटाळा प्रकल्प दाखवा आणि ५०१ रुपये घेऊन जा ; मनसेचे राज्यमंत्र्यांना आवाहन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मुंबई मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत डोंबिवली शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मनसेने रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपवर कडाडून टीका केली आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम आणि केडीएमसी गटनेते मंदार हळबे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कदम यांनी ‘डोंबिवलीतील चाकरमानी ट्रेनमध्ये लटकत प्रवास करतात त्यानंतर पुन्हा रस्ते मार्ग वाहतूक कोंडीत बंद आहेत. न कुठले मनोरंजन केंद्र आहे. स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नाट्यगृह बंद असतात. साडे चार वर्षे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. या साडे चार वर्षांत डोंबिवलीसाठी त्यांनी मंत्री म्हणून कोणता प्रकल्प आणला’ असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच या १० वर्षांत एक तरी प्रकल्प, विकासकामे पूर्ण झाली आहेत आणि पूर्ण झालेल्या विकास कामात कोणतही घोटाळा आणि कोणतीही चौकशी लागू नसेल, असे एक तरी विकास काम दाखवावे आणि राज्यमंत्री चव्हाण यांनी मनसेकडून ५०१ रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान मनसेने दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!