नवी दिल्ली : देशात एकाबाजूला कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत.
शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, शैक्षणिक संस्थांचे अध्यापनाचे कार्य बंद ठेवण्याचे आदेश
दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका वाड्रा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कामगारांना आपले दागिने आणि घरे गहाण ठेवून जीवन जगावे लागत असल्याची टीका त्यांनी यांनी केली आहे.
यूपी सीएम ने पीएम साहब को बुलाकर एक आयोजन कर बताया कि छोटे और मझोले उद्योगों में लाखों रोजगार मिल रहे हैं।
लेकिन हकीकत देखिए। पीएम के संसदीय क्षेत्र के बुनकर जो वाराणसी की शान हैं, आज गहने और घर गिरवी रखकर गुजारा करने को मजबूर हैं। लॉकडाउन के दौरान..1/2https://t.co/IxKoRC9Ul1
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 1, 2020
पंतप्रधान मोदी ज्या मतदारसंघामधून खासदार झाले आहेत तेथील शान असणाऱया विणकाम कामगारांना आज दागिने आणि घर गहाण ठेवून जगावे लागत आहे. लॉकडाउैनच्या कालावधीमध्ये या कारागिरांकडे कामच उरलेल नाही. छोटे व्यावसायिक आणि कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे नुसाता प्रचार नाही तर आर्थिक मदत देणारे एखादे पॅकेजच त्यांना या संकटातून वर काढू शकते, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
सरकारी बंगला सोडल्यावर प्रियंका गांधी-वाड्रा ‘या’ शहरात राहण्याची शक्यता
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लहान आणि लघु उद्योगांमध्ये लाखो रोजगार उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र खरं काय आहे ते पाहा, असं म्हणत प्रियांका यांनी एक ट्वीट केले आहे.प्रियांका यांनी केलेल्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

