इंग्लंड : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यातील न्युझीलंडविरुद्धच्या डब्ल्युटीसी सामन्यात रिषभ पंत हा भारतीय संघाचा सदस्य होता. डब्ल्युटीसी सामन्यानंतर भारतीय संघ २० दिवसाच्या सुटीवर गेला होता.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंत मागील 8 दिवसांपासून विलगीकरणात असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणं नाहीत. मात्र, तरीही सुरक्षा म्हणून आणखी काही दिवस विश्रांती करण्यास सांगितले आहे. तसेच भारतीय संघासोबत डरहमलाच्या सराव सामन्यासाठीही पंत नसणार आहे. पंतची प्रकृती ठिक होण्यासाठी किती दिवस लागतील, याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. दरम्यान मागील काही दिवसांपासून युकेमध्ये आढळणारा डेल्टा वेरियंटच पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुशांतच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा कारवाईस नकार ; सुचवला नवा मार्ग
- ‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’ ; फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
- ट्वीटरवर अंकुश आणून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही – नवाब मलिक
- अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

