टीम महाराष्ट्र देशा : शिर्डीत मनसेच्या नगरसेवकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालिकेतील नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची पळवा-पळवी सुरु झाली आहे. अशातच मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कोते हे रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करत असताना, त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु काही वेळापुर्वीच अपहरण झालेले नगरसेवक दत्तात्रय कोते हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले. स्वतःहून ते लोणी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र नेमकं अपहरण का झाले, आणि ते कोणी केले ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, स्थानिक पातळीवरील राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारची पळवा-पळवी आणि लपवा-छपवी कायमच पाहायला मिळत असते. ज्या दिवशी नगराध्यक्ष, महापौर, सरपंच आणि इतर पदांच्या निवडीवेळी अशा प्रकारे सदस्य गायब करून बहुमत मिळवले जाते. त्यामुळे हे झालेले अपहरण अशाच प्रकारचे असल्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

