Share

धक्कादायक; औरंगाबाद जिल्ह्यातील ७४८६ विद्यार्थ्यांची नावे दोन-दोन शाळेत दाखल

Published On: 

औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे काम सुरू आहे. मात्र आधार लिंक करत असतांना जिल्ह्यातील ७४८६ विद्यार्थ्यांची नावे दोन-दोन शाळेत आढळून आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश जि.प.चे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिले आहेत. मात्र या पाठीमागे मुख्य सूत्रधार कोण याचा शोध अजूनही लागलेला नाही.

शालेय विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आधार लिंक करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच जवळपास ७४८६ विद्यार्थ्यांची नावे दोन ठिकाणी असल्याचे आढळून आली आहेत. जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये ही नावे असल्याचे दिसून येत आहे. जि.प. शिक्षण समितीच्या सभापती अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हि घटना उघड झाली आहे. पटसंख्या वाढवून शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, यामुळे जवळपास २५० शिक्षकांची पदे वाचलेली आहेत. आता डबल नावे असल्यानंतर २५० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. दरम्यान, हा डबल गेम करण्यासाठी शिक्षण विभागाचे कोण जबाबदार आहेत? याचा शोध सुरू असल्याचे सभापती गलांडे यांनी सांगितले. या संदर्भात केंद्रप्रमुखांकडून खुलासा मागविला असून, तो समाधानकारक आला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती गलांडे यांनी बैठकीत दिले. दरम्यान, गावात असताना एक आधार आणि उसतोडीसाठी किंवा इतर कामासाठी बाहेरगावी गेल्यावर त्याठिकाणीही आधारची नोंदणी केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!