औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापुर तालुक्यातील सर्व नद्यांसह पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. शेतीसह, अन्नधान्य, पाळीवप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी, मका आदींसह सर्वच हंगामी पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, शिवसैनिक आपल्या पाठीशी खंबीर उभा असून आपण हाक द्या शिवसेना आपल्या मदतीसाठी कायम तयार आहे असे आश्वासन आ. अंबादास दानवे यांनी शेतकरी, नागरिकांना दिले.
एवढ्यावरच न थांबता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्या नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे अशा कुटुंबांना त्वरित किराणा सामान व जीवनावश्यक वस्तू ,संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. शिवना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी गावांमध्ये शिरल्याने घरांचे, दुकानांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला असून शिवना नदीच्या काठावरील अनेक गाव वस्त्यांवरील नागरिक बेघर झाले आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे साहेब यांनी तालुक्यातील ढोरेगाव, सोलेगाव, पुरी , पिंपळवाडी या गावातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली.
नुकसानग्रस्त नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना धीर देऊन दिलासा दिला. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात जीवनावश्यक वस्तू, संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या असून ही मदत नसून हे आमचे कर्तव्य समजतो. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा प्रश्न विधान परिषदेत मांडून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त व लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणणाऱ्या राऊतांची निलेश राणेंनी उडवली खिल्ली
- ‘ममता जिंकल्या असल्या तरी ‘मॅन ऑफ द मॅच’ मीच’, पराभूत प्रियंका तिब्रेवालांचा दावा
- ‘शिवसेनेने चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार सुरू केलाय’, चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- नवीन बॅंकिंग नियमन कायदे सहकारी बॅंकासाठी मारक- शरद पवार
- ममता बॅनर्जींचा ५८३८९ मतांनी विजय; प्रियांकांना केवळ २० हजार मते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

