🕒 1 min read
हैदराबाद- दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूबाबत आज अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या.अनेक माध्यमांनी कामत यांच्या निधनाच्या बातम्या चालवल्या होत्या तर अभिनेता रितेश देशमुखनं निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर आहे असे ट्वीट केले होते.
वाचकांना नेमके खरे आणि खोटे काय हेच समजत नव्हते मात्र आता निशिकांत कामत याचं निधन झालं असल्याचं अधिकृतरीत्या समोर आले आहे.दृश्यम, लय भारी, डोंबिवली फास्ट अशा चित्रपटांतून प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे दिग्दर्शक निशिकांत कामत हे यकृताच्या विकाराने त्रस्त होते. साडेचार वाजता त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. रितेशने देखील स्वतः निशिकांतच्या निधनाच्या बातमीला पुष्टी दिली आहे.
गेले काही दिवस त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते . जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं होतं.दरम्यान,उपचारांसाठी दाखल केल्यावर त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं.
निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2006 मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील’मुंबई मेरी जान’ या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम,मदारी,फुगे यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. याशिवाय,सातच्या आत घरात,रॉकी हॅण्डसम,जुली,भावेश जोशी या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: शरद पवारांच्या ताफ्यातील दोघांना कोरोनाची लागण
बैलपोळा सण घरातच साजरा करा; जालना जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

