Share

#फेक : पुण्यातील मेट्रो ब्रीज कोसळल्याचे व्हायरल फोटो खोटेच!

Published On: 

पुणे : काल दिवसभरात पुण्यातील मेट्रो ब्रीज कोसळल्याचे मेसेज व्हायरल झाले. हे मेसेज व्हॉट्सऍपसह इतर सोशल मीडियाद्वारे पसरवले गेले. मात्र, आता हे फोटोच खोटे असल्याचे उघडकीस आले आहे. स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दल माहिती दिली असून अशी कोणतीही दुर्घटना पुण्यात घडली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काल, व्हाट्सऍपवर मेट्रो ब्रीज कोसळल्याचे तीन फोटो व्हायरल झाले. या फोटोसोबत एक मेसेज देखील पसरवला गेला. त्यात, ‘फिओनिक्स मॉल, विमाननगर जवळील मेट्रो ब्रीज कोसळला’ असा संदेश लिहिण्यात आला होता. अवघ्या काही मिनिटांतच हा मेसेज वाऱ्याच्या वेगाने पसरला. मात्र, यानंतर हि घटना पुण्यातील नसल्याचे देखील समोर आले आहे.

…अन् वकिलानेच पाठवली पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ” मेट्रोचा निर्माणाधिन पूल कोसळल्याची छायाचित्रे समाज माध्यमातून, विशेषतः #WhatsApp वरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ती छायाचित्रे पुण्यातील असल्याचा दावा केला गेलाय. मात्र या दाव्यात कोणतेही तथ्य नसून अशी कोणतीही घटना पुण्यात घडलेली नाही.”असे त्यांनी स्पष्ट केले.

बार्शीचे राजकारण नवे वळण घेण्याची शक्यता, बाळराजे पाटील-अनगरकरांचा बार्शी संपर्क वाढला…

मुरलीधर मोहोळ यांनी लगेचच मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती खोटी असल्याचे सांगितले. ” यासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले असून हा प्रकार पुणे शहरातील नाही. आपल्यालाही असे फोटोज आणि मेसेज आले असल्यास आपण फॉरवर्ड करु नका !”, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

भक्ती-शक्ती संगम – श्रीसमर्थस्थापित चौथा मारुती – माजगावचे श्रीमारुतीराय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!