Share

Shivsena | शिवसैनिकांचा संताप! सदा सावरकरांच्या कार्यालयावर दगड फेक करत फाडले पोस्टर

Published On: 

मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, यानंतर शिवसैनिक संतापले असून त्यांनी सदा सावरकर यांच्यावर आक्रमक झाले आहे.

सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेकः

आज दुपारी दादर पोलीस स्थानकाच्या बाहेर लागलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले असून सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर देखील दगदफेक करण्यात आली आहे. त्यामुळे दादरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

एकनाथ शिंदे यांचा आदेशः

या प्रकरणानंतर संतोष तेलवणे यांनी प्रतिक्रीया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधला. यावरुन संतप्त शिंदेंनी कार्यकर्त्यांना गंभीर आदेश दिला आहे. ठाकरे गटाला जशास तसे उत्तर द्या असा आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, सदा सरवणकर यांच्यावर बंदूक बाळगल्याचा आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.या प्रकरणावरुन 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली असल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!