🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना सत्तेत जरूर आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन शिवसेना सत्तेत आहे, नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे आज औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्मण झाली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली, यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीवरून बँक आणि पीकविमा कंपन्यांवर निशाणा साधला, इतकेच नव्हे तर शिवसेना सत्तेत जरूर आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन शिवसेना सत्तेत आहे, नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.
याचबरोबर मी तुमच्या वतीने जगदंबेला साकडं घालतो की लवकरात लवकर छान पावसाला सुरुवात होऊ दे आणि माझा मराठवाडा सुजलाम सुफलाम होऊ दे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.
"शिवसेना सत्तेत जरूर आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन शिवसेना सत्तेत आहे, नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही."
– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे.#Shivsenawithfarmers pic.twitter.com/o8VeJ6BPH3— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 22, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
