Share

राज ठाकरेंच्या विषयावर बोलणे योग्य नाही – खा संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अनेक राजकीय नेते उद्योग क्षेत्रात असून ते त्याचं वयक्तिक काम करत असतात. यंत्रणांना आपले काम करू द्यायला हवं, त्यामुळे राज ठाकरे यांच्या विषयावर आपण बोलणे योग्य नसल्याचं मत शिवसेना खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीसीकडे राजकीय दृष्टीने पाहणे योग्य नसल्याचं देखील राऊत म्हणाले.

मुंबईतील शिवाजीपार्क भागामध्ये असणाऱ्या कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडल्याने मनसे मात्र आक्रमक झाली आहे.

नरेंद्र मोदी नव्या भारताचे हिटलर, पंतप्रधानांवर मनसेची कडाडून टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!