Share

हे सरकार ५ वर्ष चालेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न याबाबत केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रामविलास पासवान यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची बैठक घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या याच दिल्ली दौऱ्यावर आणि वर्षा बंगल्यावर शिवसेना खासदारांच्या झालेल्या बैठकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचं सरकार ५ वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा. हे सरकार ५ वर्ष चालेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, असं संजय राऊत म्हणाले.

…म्हणून भाजपकडून आपल्या आमदारांना सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवलं जातंय – भुजबळ

कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी, यावरही चर्चा झाली. बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले. चर्चेचा मुख्य विषय कोरोनाच्या उपाययोजना होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर  आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील भाजपचे आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवले जात असल्याची खोचक टीका छगन भुजबळ यांनी केली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. तत्त्पूर्वी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजपच्या आमदारांनी इकडे-तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येणार, असे लॉलीपॉप दाखवले जात असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

‘भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!