Share

…म्हणून भाजपकडून आपल्या आमदारांना सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवलं जातंय – भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न याबाबत केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रामविलास पासवान यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांच्या याच दिल्ली दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील भाजपचे आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवले जात असल्याची खोचक टीका छगन भुजबळ यांनी केली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. तत्त्पूर्वी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजपच्या आमदारांनी इकडे-तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येणार, असे लॉलीपॉप दाखवले जात असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

‘भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं’

दरम्यान, आज भुजबळ यांनी नाशिकच्या लॉकडाऊनसंदर्भातही भाष्य केले. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते आल्यानंतर नाशिकच्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

तर ज्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी सद्भावनेतून पुढाकार घेऊन लॉकडाऊन केले, मात्र त्यातून काही हाती लागत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे; पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ञांसमवेत नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी लॉकडाऊन तसेच इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून घेतले जातील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते.

पुणे, ठाणे नंतर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!