Share

‘राम मंदिराचा पाया शिवसेने रचला, उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्याचा अधिकार आयोजकांचा’

Published On: 

मुंबई : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने काल (शनिवार) एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.

निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

महाराष्ट्र हादरला : एका दिवसातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी रुग्ण वाढ

राम मंदिर उभारणीसाठी आग्रही असलेले मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भुमिपूजनाचे निमंत्रण येईल का पासून निमंत्रण आल्यावर ते जातील का अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही शिवसेना आहे. अस सावंत म्हणाले आहे.

तर, निमंत्रण देण्याचे काम आयोजकांचे आहे. निमंत्रण आल्यास कोणी जावे हे मुख्यमंत्री ठाकरे ठरवतील. प्रभुरामचंद्र हा श्रध्देचा विषय असून त्याला राजकिय रंग दिला जाऊ नये.राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही शिवसेना आहे. संतांचे सर्व आखाडे लढत होते. कायद्याची लढाई सुरू होती हेही मान्य आहे. यात श्रेय घेण्याचा विषय नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेले होते. असं देखील अरविंद सावंत म्हणाले आहेत.

‘सोलापूर जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध’, या शहराचे मी काही देणे लागतो – शरद पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!