Share

महाराष्ट्र हादरला : एका दिवसातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी रुग्ण वाढ

Published On: 

महाराष्ट्र: राज्यातली बहुतांश शहरे व जिल्हे पुन्हा कडक लॉकडाऊनमध्ये असून देखील राज्यातील कोरोना संसर्गाचा कहर हा वाढतच आहे. गेले ३ दिवस दररोज रुग्णांचा आकडा ८ हजार पार जात असतानाच आज नवा उच्चांक गाठला आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,५१८ ने वाढली आहे. तर २५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे.

मागील लागोपाठ ३ दिवसांमध्ये कोरोनाचे दिवसाला ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले होते, यानंतर आता आज ही संख्या ९,५०० पेक्षा जास्तने वाढली आहे. तसेच आजही, आजही मुंबईला मागे टाकून पुण्यात सर्वाधिक रूग्ण वाढले. आज पुण्यात १८१२ तर मुंबईत १०३८ रूग्णसंख्या वाढली. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १,०१,३८८ एवढी आहे. यातले ७१,६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या २३,६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज दिवसभरात कोरोनामुळे ६४ मृत्यू झाले आहेत.

मोठी बातमी : रुपाली चाकणकर यांची प्रकृती अस्वस्थ, पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल

तर, पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५४,६२४ एवढी झाली आहे. यात ३३,६४८ हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १९,५१७ एवढी आहे. आत्तापर्यंत पुण्यात कोरोनामुळे १,३५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

भाजपाच्या दूध आंदोलनावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे गंभीर आरोप

राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,१०,४५५ एवढी झाली आहे. सद्या, १,२८,७३० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर आजपर्यंत १,६९,५६९ जणांना पूर्णपणे बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३,९०६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ५४.६२ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ११,८५४ जणांचा मृत्यू झाला. राज्यातला कोरोना मृत्यूदर हा ३.८२ टक्के एवढा आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!