🕒 1 min read
मुंबई : अनेक अडथळ्यानंतर अखेर भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला आज सुरुवात होणार आहे. प्रमुख खेळाडूच्या अनुस्पथितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा संघ लंकादहन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद हे राहुल द्रविडकडे सोपवण्यात येणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघात यष्टीरक्षकपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. संजु सॅमसन आणि इशान किशन यापैकी कुणाला संधी द्यायची हा पेच प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार धवन यांच्यासमोर आहे. संजु सॅमसनने २०१५ साली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर इशान किशनने काही महिन्यापुर्वी इंग्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले आहे.
मात्र दोन्ही खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी अद्यापही मिळालेली नाही. यामुळे आजच्या सामन्यात कोणत्या यष्टीरक्षकाचे भारताकडून पदार्पण होणार याचा उलगडा आजच्या सामन्यात होईल. आयपीएलमध्ये चांगली कामगीरी केल्यामुळे संजुला राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर इशान किशनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनेकदा चमकदार कामगीरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी महाराजांनी ‘तो’ कायदा लावलाच तर भाजपचे १६० आमदार बाद होतील; संजय राऊतांचा खोचक टोला
- पगार नसल्याने चिकटटेप विकावा लागणाऱ्या शिक्षकाला दरेकरांचा मदतीचा हात, राज्य सरकारवर टीका
- पुणेकरांना किंचित दिलासा : कोरोनामुक्तांचा आकडा वाढला, तर नव्या कोरोना बाधितांची संख्या…
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- पवार-मोदी यांच्या भेटीनंतर राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता ? चंद्रकांत पाटलांनी दिलं ‘हे’ उत्तर

