Share

संयुक्त पत्रक काढत युतीची अधिकृत घोषणा, जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना – भाजपने महायुतीची घोषणा केली आहे. एक संयुक्त पत्रक काढत भाजप शिवसेनेने महायुती जाहीर केली आहे. या पत्रकावर भाजप कडून चंद्रकांत पाटील आणि शिवसेने कडून सुभाष देसाई यांची स्वाक्षरी आहे. या पत्रकातून युती आली असल्याच नमूद केले आहे. मात्र युतीचा नेमका फॉर्म्युला काय आहे. हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

“राज्यात गेली ५ वर्ष यशस्वीपणे राज्य कारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याची काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्र पक्ष्चे नेते सर्वश्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले महादेव जानकर , विनायक मेटे , सदाभाऊ खोत , यांच्यात झालेल्या चर्चेअंती महराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला आहे”, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुका लागल्यातरी युतीबाबत साम्भार्म कायम होता. मात्र आता युतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप – शिवसेना आणि अन्य मित्रपक्ष महायुती करून विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. आज रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीचा फॉर्म्युला जाहीर करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1178680322726060032?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178676459348488197?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178670208212324352?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!