Share

शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटतांना रंगेहात पकडले

Published On: 

वाणगाव: भाजपने पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पैशांचा बाजार सुरु केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रानशेत भागात भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले आहे. भाजपने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांना तिकीट दिले आहे. शिवसेना आणि भाजपसाठी हि लढाई खूप प्रतिष्ठेची समजल्या जात आहे. भाजप कार्यकर्त्यांना चक्क पैशे वाटतांना पकडल्यामुळे पालघर मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले ?

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार अमित घोडा, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई अन्य कार्यकर्ते रानशेत भागात प्रचार करत होते. दरम्यान, दोन व्यक्ती हातात पिशव्या घेऊन संशयास्पदपणे फिरत असतांना शिवसेना कार्यकर्त्यांना दिसले. पिशव्यांची झडती घेतली असता आतमध्ये पैशांची पाकिटे दिसून आली. तुम्हाला कुणी पाठवले, असा सवाल करताच त्या दोघा इसमांनी आम्हाला भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांनी पाठवले असल्याची स्पष्ट कबुली दिली. तसेच ‘पैसे लो… कमल के फूल पर बटन दबाव…’ असे आम्ही मतदारांना सांगत असल्याचे या व्यक्तींनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल अतिथीमध्ये आमचे काही लोक येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर फिल्डिंग लावली. आणि तेथे झडप घालून १२ जणांना पकडले. हा प्रकार समजताच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार राजन विचारे घटनास्थळी पोहचले. पैसे वाटणाऱयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी पोहचले व त्यांनी पंचनामा केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!