सातारा : एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले तेव्हापासून राज्यातील राजकीय वातावरण बदललेलं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील राजकीय नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाची खेळी खेळताना दिसत आहेत. अशातच शिवसेनेचे सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला साधला आहे.
शहाजीबापू यांचा अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला-
अमोल मिटकरी हे राजकारणात नवे आहेत. त्यांनी सध्या संजय राऊत यांना आपला गुरु मानला आहे. त्यामुळे जे संजय राऊत यांचे झाले तेच अमोल मिटकरी यांचे पण एक दिवस होणार, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. माण तालुक्यातील म्हसवड जवळच्या विरकरवाडी येथे किसन विरकर यांच्या स्मरणार्थ ओपन भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरण समारंभाला पाटील उपस्थित असून त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, आमच्या सारख्या लोकांची एखादी गोष्ट चुकली तरी चालेल. पण पक्षाचा एखादा प्रवक्ता कागद हातात मिळाल्यानंतर काहीही बडबड करत असेल तर हे चुकीचं आहे.
शरद पवार यांनी चुकीची केलेली निवड म्हणजे अमोल मिटकरी-
तसेच शरद पवार यांनी चुकीची केलेली निवड म्हणजे अमोल मिटकरी, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या टीकेला अमोल मिटकरी काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Shivsena । तुमच्यात दसरा मेळावा घेण्याची हिंमत आहे का?; शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटाला आव्हान
- Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे
- Jayant Patil । “भाजपाला हिंदूत्वाशी घेणे-देणे नाही, तर…”; जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण
- Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा
- Eknath Shinde । विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

