मुंबई- दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे.कॉंग्रेस,राष्ट्रवादीसह राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेने देखील या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी बळीराजासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जनतेला केले आहे. तसंच, हे काही राजकीय आंदोलन नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असंही राऊत म्हणाले.
शेतकऱ्यांनी लॉकडाउनमध्ये सगळे घरी बसलेले असताता त्याने आपल्याला साथ दिली, शेतकऱ्यांनी आज आपल्याला साद दिली आहे. त्याला आपली गरज आपण त्याला साथ द्यायला हवी. जनतेनं स्वच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे हा बळीराजांना खरा पाठिंबा ठरेल’ असं आवाहन राऊत यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने केला ‘हा’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ

